Makar Sankranti : हिंदू शास्त्रा नुसार, दक्षिणायन हे देवाच्या रात्रीचे किंवा नकारात्मकते चे प्रतीक आहे आणि तर, उत्तरायण हे देवाच्या दिवसाचे प्रतीक किंवा सकारात्मकते चे प्रतीक मानले जाते.
Makar Sankranti in Marathi
मकर संक्रांती ही तिथी आहे जेव्हा पासून सूर्याची उत्तरे कडे वाटचाल सुरू होते. कर्क संक्रांती ते मकर संक्रांती हा काळ दक्षिणायन म्हणून ओळखला जातो.
मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य उत्तरेकडे आपला प्रवास सुरू करतो म्हणून, लोक गंगा, गोदावरी, कृष्णा, यमुना नदीत पवित्र ठिकाणी स्नान करतात, मंत्र उच्चार करतात.
साधारण पणे सूर्य, सर्व राशींवर प्रभाव पाडतो, परंतु कर्क आणि मकर राशीत सूर्याचा प्रवेश धार्मिक दृष्ट्या अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले.
मकर संक्रांतीच्या आधी सूर्य दक्षिण गोलार्धात असतो. या कारणास्तव, भारतात, हिवाळ्यात रात्री लांब आणि दिवस लहान असतात. परंतु मकर संक्रांतीने, सूर्य उत्तर गोलार्धा कडे आपला प्रवास सुरू करतो आणि त्या मुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतील.
मकर संक्रांत अख्यायिका
मकर संक्रांतीच्या निमित्ताने वर्ष भर लोक विविध रूपात सूर्य देवाची पूजा करून भारतातील लोकान प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. या काळात कोणतेही पुण्य पूर्ण कृत्य किंवा दान अधिक फलदायी ठरते.
हळदी कुम- कुम समारंभ अशा प्रकारे पार पाडणे ज्या मुळे ब्रह्मांडातील शांत आदि शक्तीच्या लहरींना चालना मिळेल. हे एखाद्या व्यक्तीच्या मनावर सगुण भक्तीची छाप निर्माण करण्यास मदत करते आणि देवा प्रती आध्यात्मिक भावना वाढवण्यास मदत करते.
मकर संक्रांती 2023 शुभ महूर्त
हिंदू पंचांगानुसार, 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. ग्रहांचा राजा सूर्यदेव 14 जानेवारीला रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करते. उदयतिथीनुसार मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 ला साजरी केली जाईल.
मकर संक्रांती पुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटे ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत
एकूण कालावधी: 5 तास 14 मिनिटं
महापुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटं ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत
- साहित्य
- गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे,
- तिळगूळ,गव्हाच्या लोंब्या
- सुगड,शेगडणे, धागा
पुजा
- या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे.
- या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता.
- नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा.
सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरावे. - पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे.
- यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे.
- काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे. सुगडावर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर धूप, दीप अर्पण करावे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.
परंपरा
- मकर संक्रांतीला सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं महत्त्व आहे. या दिवशी तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गुळ, लाल चंदन, लाल फुल, अक्षता टाकून ‘ओम सूर्याय नम:’ मंत्राचा जप करा आणि अर्घ्य द्या.
- मकर संक्रांतीला गरीबांना दान करा. या दिवशी दान दिल्याने पुण्य लाभतं.
- मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे. म्हणून या दिवसाला खिचडी पर्व संबोधलं जातं.
- मकर संक्रांतीला तीळगूळ खा आणि वाटा
- मकर संक्रांतीला वसंत ऋतु सुरू होतो आणि या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होतो.मकर संक्रातीच्या दिवशी कोणत्या देवांची पूजा केली जाते?
- मकर संक्रांतीला माता लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची पूजा केली जाते. प्रत्येक राज्यात मात्र मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
संक्रांत साजरी करण्याची पद्धत काय आहे?
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे. या दिवशी देशातल्या अनेक राज्यात पतंगोत्सव सुरु होतो. तीळ आणि गुळ यांचा लाडू किंवा बर्फी बनवली जाते आणि ती मित्र मंडळींसह खाल्ली जाते.
Great post
Thanks