भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणारा चढ-उतार पाहता कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
Cotton Farming 2023
देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कापूस दर स्थिर असून ते प्रामुख्याने आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दरम्यान स्थिरावले आहेत.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील कापूस उत्पादक शेतकरी, नीळकंठ प्रल्हाद पाटील यांनी कापसाला कमी भाव मिळत असल्याने औरंगाबाद खंडपीठात केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे.विशेष म्हणजे निळकंठ पाटील यांनी आपल्या या याचिकेत कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळावा अशी मागणी सुद्धा केली आहे.
आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाला 10 हजार रुपये किमान भाव मिळवून देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.नीळकंठ प्रल्हाद पाटील यांनी आपल्या या याचिकेत केंद्र सरकारने ऐन हंगामात 11 हजार टन कापूस आयात केल्याने व्यापारी शेतकर्यांकडून कापूस घेत नसून यामुळे कापूस विक्री थांबली असल्याचे नमूद केले आहे.
राज्याच्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्र सरकारला कापसाला 12300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा यासाठी पत्र दिले आहे.पण केंद्र सरकारने त्यावर अद्यापही निर्णय घेतलेला नसल्याचे याचिकेत म्हटले असून न्यायालयाचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात जवळपास 7 % नी चढ-उतार झालेला पाहायला मिळला आहे.परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.देशातील बाजारात देखील कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली.
डॉलर मजबूत झाल्याने कापूस महाग!
डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे अवमुल्यान झाले.एक डाॅलर 82.18 रुपयांवर आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस आणखी महाग झाला असून याचा फायदा देशातील कापसाला मिळू शकतो.मागील काळात डाॅलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कापूस आणखी स्वस्त झाला होता.यामुळे आता देशातून कापूस निर्यातीला आणखी बळ मिळेल.
जाणकारांच्या मते यंदा 8500 ते 9500 पर्यंतचे दर मिळू शकतो.यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवून आपल्या विक्रीचे नियोजन आखले पाहिजे.घाबरून जाता विक्री करणे टाळावे जेणेकरून बाजारात कापसाची मोठी आवक होणार नाही आणि आवकेचा परिणाम दरावर होणार नाही.
आजचे ताजे कापूस बाजार भाव येथे पहा