OldOld pension : जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर आता या राज्यात आता महापालिका,यूआयटी,वीज कंपन्या किंवा इतर महामंडळे, सरकारी उपक्रम आणि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.कार्मिक विभाग राजस्थानने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाबाबत आदेश जारी केला आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार वरील निमशासकीय कर्मचाऱ्यांना ओपीएसचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याचा पर्याय दिला जाईल.वरील युनिट्स किंवा संस्थांमध्ये कार्यरत किंवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना OPS चा लाभ घ्यायचा असेल, तर वित्त विभागाने जारी केलेले फॉर्मेट भरून 30 जूनपर्यंत आपापल्या विभागाकडे त्यांना जमा करायचा आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम जमा करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात येणार आहे.
OPS latest updates
वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार,ज्या संस्थांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही,त्या संस्थांना जीपीएफ लिंक पेन्शन योजना लागू करण्यासाठी नवीन नियम तयार करावे लागतील आणि पेन्शन फंड तयार करावा लागेल.सदरील रक्कम राज्य सरकारच्या पीडी खात्यात जमा करावी लागेल.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने CPF किंवा EPF च्या नियोक्त्याच्या योगदानाची संपूर्ण रक्कम संबंधित संस्थेच्या पेन्शन फंडात जमा केल्यापासून पेन्शन फंडात जमा केल्याच्या तारखेपर्यंत 12 टक्के व्याजासह 30 जूनपर्यंत जमा करावी लागेल.
कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात नवीन शासन निर्णय आला, पहा सविस्तर