Crop insurance : मार्च,२०१३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी एकूण रु. २७ कोटी१८ लक्ष इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.
New Crop insurance list 2023
राज्यात दि. ४ ते ८ मार्च व दि. १६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
अतिवृष्टी नुसकान भरपाई 2023
राज्यात मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दि. ८ मार्च, २०२३ च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते.
अतिवृष्टी नुसकान भरपाई शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
विभागीय आयुक्त, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणी प्रस्तावांनुसार दि.१०.०४.२०२३ च्या शासन निर्णयान्वये निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.
Ativrushti nuskan bharpai
अतिवृष्टी,पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामाल एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
मार्च 2023 अतिवृष्टी नुसकान भरपाई जिल्हावार यादी येथे पहा