जुनी पेन्शन योजना बाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी केले आहे.त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला असता बाबत एक मोठी घोषणा देखील आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या अधिवेशनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,शिक्षणमंत्री दीपक केसरकर,आमदार योगेश कदम,शिक्षक महासंघाचे नेते संभाजीराव थोरात आणि राज्याध्यक्ष अंबादास वाजे उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे.शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांना शिकविण्या व्यतिरिक्त इतर लादलेली कामे कमी करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे .
Old pension scheme
राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यामुळे शासन जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सकारात्मक असल्याच आता उमटू लागले आहेत. संदर्भात लवकरच योग्य निर्णय निघण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.