GovEmployee Retirement Age : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती.
कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय वाढणार
शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत.राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे (Retirement age) वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने राज्य शासनाकडून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक पार पडली आहे. या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जावे या संदर्भात अभ्यासपूर्ण भूमिका मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढ्यात मांडण्यात आली.
मुख्यंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक
मुख्यमंत्री महोदय यांनी प्राधान्याने कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी महासंघाला दिले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी हजर होते.
सेवा निवृत्तीच्या वयात वाढ करू नये अशी देखील मागणी करणारे पत्र मुत्र्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.दरवर्षी 3 टक्के कर्मचारी निवृत्त होतात.16 लाख कर्मचाऱ्यांत दरवर्षी 48 हजार नोकऱ्या निर्माण होतात. जर निवृत्तीवय दोन वर्षाने वाढवले तर 96000 म्हणजे एक लाख नोकऱ्या निर्माण होतात त्या तरुणांना मिळणार नाहीत.
DA वाढीचा नवीन फॉर्म्युला आला! आता असा मिळणार महागाई भत्ता
Employee Retirement Age
राज्यातील लाखो सुशिक्षित बेकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा निर्णय आहे.अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.पण एकंदरीत राजपत्रित अधिकारी महासंघाचे ही बैठक सफल ठरली.आता सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत शासन केव्हा निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.