Retirement age : मोठी बातमी… आता ‘या’ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत नोकरी! शासन निर्णय निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Retirement age : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाबरोबर मोठी चर्चा सुरू असतानाच आता याबबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

आता या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेले आहे तर बघूया सविस्तर माहिती

‘या’ कर्मचाऱ्यांना 70 वर्षापर्यंत करत येणार नोकरी

राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. 

या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे खालील तरतूदींप्रमाणे भरण्यात यावीत.

Retired employees new updates

  • सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील. 
  • मानधन रु.२०,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त)
  • सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक करताना संबधित गावातील कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करा. 
  • संबंधित गावात सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास 7 किमी परिसरातील निवृत्त शिक्षकाचा विचार करण्यात यावा.
  • जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येईल.
  • संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
  • संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.
  • वरीलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.
  • वरीलप्रमाणे नियुक्त्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात.
  • मानधन करार पध्दतीने नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही.
  • संपूर्ण प्रक्रिया ही आयुक्त (शिक्षण) यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात.
हे पण पहा ~  Old pension : धक्कादायक... सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास निर्णयाला स्थगिती ?

सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त वय शासन निर्णय दि.11/7/2023 येथे पहा

Retirement age

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment