State employees : राज्यातील नायब तहसीलदार हे पद राजपत्रित संवर्गाच्या दर्जाचे आहे.मात्र, त्यांना वाढीव वेतनश्रेणी न देता वर्ग तीनची वेतनश्रेणी देण्यात येत आहे.वेतन त्रुटी बाबत नेमलेल्या बक्षी समितीच्या अहवालातही सुधारणा झाली नसल्याने राज्यातील अधिकारी वर्गाने दुसऱ्या मागणीसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका घेतली होती.
State employees news
बेमुदत संपासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली असता सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा होऊ शकली नव्हती. तहसीलदार,नायब तहसीलदार यांच्या संघटनेने आपला संप सुरूच राहणार असल्याचे जाहीर करताच आज पुन्हा एकदा महसूल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे.
वाढीव वेतनश्रेणी वेतनश्रेणीची मागणी मान्य!
आत्ता तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संघटनेसोबत महसूल मंत्री यांनी बैठक घेतली आणि राज्य शासनाने नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी 4800 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संपावर ठाम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची मागणी मान्य झाली असल्याने संघटने कडून संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.परंतु 30 एप्रिल पर्यंत याचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.
जुन्या पेन्शन नंतर आता यामुळे वाढणार सरकारची डोकेदुखी