सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली असून आता वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च संबधित प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. पाहूया सविस्तर माहिती
State government employee’s medical bills
शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक १६ मार्च, २०१६ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मध्ये तरतूद करण्यात आली आहे.शासकीय विभागाच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील वर्ग-१ ते ४ च्या अधिकारी / कर्मचा-यांची वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीची क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून निकाली करण्यासाठी खुप दिवसापासून मागणी होती.
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती शासन निर्णय
दि.०६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या मंजूरीचे वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १७ जानेवारी, २०२३ च्या शासन निर्णयान्वये खालील प्रमाणे मंजूर करण्यात येणार आहे.
सरकारी अधिकारी / कर्मचा-यांच्या निव्वळ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीकरिता विभागप्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख शासन निर्णय क्रमांक वैखप्र-२०११/प्र.क्र.८३/२०१९ आ(क्षेत्र) दि. ०६.०९.२०१९ अन्वये घोषित करण्यात आले आहेत.
Employees medical bills updates
दि. १७.०१.२०२३ च्या शासन निर्णया नुसार खालीलप्रमाणे विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे अधिकार प्रदान करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च रक्कम किती आणि कशी मिळणार येथे पहा
मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुख रुपये ५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच लक्ष) वरील प्रकरणे
विभागप्रमुख रुपये ३,००,०००/- (अक्षरी रुपये तीन लक्ष) पर्यंतची प्रकरणे यांच्या स्तरावर मंजुरी देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
मेडिकल बील संदर्भात नवीन शासन निर्णय येथे पहा
1 thought on “State employees news : खूशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 13/3/2023”