State employees : नोकरी करत असाल तर दर महिन्याला खात्यात येणाऱ्या पगारामागोमाग तुमची Salary Slip सुद्धा तयार असते.जिथे तुम्हाला बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन आणि ग्रॉस सॅलरीची आकडेवारी दिसते. या दोन्ही पगारांमध्ये नेमका फरक काय? कधी प्रश्न पडलाय का?
मूळ वेतन (Basic pay)
मूळ वेतन म्हणजे कर्मचाऱ्याचे मूळ उत्पन्न असते.कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन म्हणजे ओव्हरटाइम,बोनस किंवा भत्त्यांसाठी कोणतीही कपात किंवा वाढ करण्यापूर्वी त्यांना दिली जाणारी रक्कम असते.पदोन्नतीमुळे मूळ वेतनात दरवर्षी वाढ होते त्याला वेतनवाढ म्हणतात. कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या किमान 50 ते 60 % असते.
ग्रॉस सॅलरी (Gross salary)
एखाद्या व्यक्तीचे ग्रॉस वेतन म्हणजे कोणत्याही कपातीपूर्वी सर्व प्रकारच्या भत्त्यासह दिला तयार होणारा मासिक पगार होय. पगारामध्ये मूळ वेतन, घरभाडे भत्ता,gpf, nps, रजा प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता, व्यावसायिक कर, DA,TA इत्यादी सर्व प्रकारच्या भत्ता व मुळ वेतनाची समावेश होतो.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
नेट सॅलरी (Net Salary)
नेट सॅलरी म्हणजे गटविमा, सणकर्ज,सोसायटी, विमा पॉलिसी इ. सर्व वजावट काढून टाकल्यानंतर मिळालेल्या प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा होणाऱ्या रकमेची बेरीज असते. यालाच टेक-होम सॅलरी म्हणून देखील ओळखले जाते. हा तुमच्या खात्यात प्रत्यक्षात येणारा पगार असतो,त्यालाच नेट सॅलरी असे म्हणतात.
पगार खाते (salary account) किती महत्त्वाचे व कोणती बॅंक देते सर्वाधिक फायदे येथे पहा
1 thought on “Salary Slip : बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत…”