old pension news : जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे.आज कोल्हापूर दणाणून सोडत शासकीय, निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढला.सुट्टी दिवशी भर दुपारी उन्हाची पर्वा न करता 50 हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
Old pension news
Juni pension scheme साठी १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत संप पुकारला असून त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक, शिक्षकेतर,महापालिका कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
कोल्हापूर येथे गांधी मैदानातून दुपारी १२ वाजता या विराट मोर्चाला सुरुवात झाली.एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या व पांढरी वेशभूषा करून कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.शनिवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा पेन्शन मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
OPS Maharashtra latest updates
जुनी पेन्शन मोर्चाला महसूल कर्मचारी,जिल्हा परिषद,महापालिका,पंचायत समिती, जलसंपदा विभाग तलाठी, ग्रामसेवक,चतुर्थ श्रेणी अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग मोर्चामध होता.
बापरे..आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅज्युएटी व पेन्शन