Online Gratuity Calculator : एकाच कंपनीत सलग काही वर्ष काम केल्यामुळे कंपनी कृतज्ञता म्हणून ग्रॅच्युइटी देऊ करतात.पण त्यासाठी काही सेवा कालावधी पूर्ण करण्याची गरज असते.आज आपण ग्रॅच्युइटीचे गणित कसे करतात? हे जाणून घेऊया
How To Calculate Gratuity
एका कंपनीत किंवा सरकारी नोकरीत सगल पाच वर्ष काम केल्यानंतर तो कर्मचारी Gratuity साठी पात्र ठरतो असे मानले जाते.नवीन एका कंपनीत कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांना ग्रॅच्युइटीबाबत फारशी कल्पना नसते.खासगी व सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ग्रॅच्युइटीचा अधिकार आहे.
पगार आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, तेलक्षेत्र, बंदरे आणि रेल्वे यांना लागू करण्यात आला आहे.सरकारी किंवा खाजगी असे कर्मचारी की,ज्या कंपनीत किमान 10 कर्मचारी आहेत, अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला सदरील योजनेचा लाभ मिळतो.
Gratuity new updates
कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा निवृत्त झाला तरी नियमांनुसार त्याला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते. मात्र, त्या कर्मचाऱ्याला सतत पाच वर्ष काम करते बंधनकारक असल्याचे मानले जाते असले तरी,काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी दिवस काम करुनही तो कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतो.
कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्या
- कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्यानुसार कलम 2A अंतर्गंत ‘सलग काम करणे या अंतर्गंत पाच वर्ष काम न केल्याने अनेक कर्मचारी ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात.
- ग्रॅच्युइटी कायद्यानुसार कलम 2A नुसार भूमिगत खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सलग चार वर्ष 190 दिवस काम केले तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.
- अन्य संस्थांमधील कर्मचारी चार वर्ष 240 दिवस (4 वर्ष 8 महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.
- कर्मचाऱ्याचा नोटिस पिरीयडदेखील यामध्ये नोंदवला जातो. कारण नोटिस कालावधी सलग सेवामध्ये गणला जातो.
कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन कसे केले जाते? येथे पहा