Employee Retirement Age : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती.
सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत समिती स्थापन
राज्य सरकारचे एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातील 3% कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात.आयएएस,आयपीएस आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय यापूर्वीच 60 करण्यात आले आहे.सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत अभ्यासासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्ती सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती.
महाराष्ट्र सरकार सेवानिवृत्त वय वाढवण्यास अनुकूल
महाराष्ट्र राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे (Retirement age)वय 60 वर्षे करण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.यामुळे राज्य शासन याबाबतचा शासन निर्णय केव्हा काढते? यावर सकारात्मक निर्णय केव्हा घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार!
निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा लाखापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो.परिणामी 60 हजार कर्मचारी वर्गास सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो. तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचतील. शनिश्चितच जर राज्य कर्मचाऱ्यांचे हे म्हणणे खरे असेल तर महाराष्ट्र सरकारकडून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षांनी वाढ केली जाऊ शकते असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
1 एप्रिल पासून Income tax नियमात मोठे बदल पहा सविस्तर
1 thought on “Employees Retirement Age : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार! ‘या’ एका कारणामुळे होणार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष, पहा..”