State employees : बापरे…’या’ राज्य कर्मचाऱ्यांची राज्य सरकारकडून 960 कोटी रुपयांची देणी थकली! पहा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employees : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी दि. १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत जुन्या पेन्शन व आपल्या इतर मागणीसाठी संप पुकारला होता. कालांतराने संप मिटला पण आता राज्यातील ‘हे’ कर्मचारी थकित देणीमुळे नाराज असलेल्याचे समोर येत आहे. 

MSRTC Employees News

ठाकरे सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी सहा महिने संप पुकारला होता.सदरील प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते.मा.उच्च न्यायालयात तात्कालिक राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पुढील चार वर्षाच्या वेतनाची हमी घेण्यात आली होती.

मध्यंतरी सरकार बदलले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.पण सध्या सत्तेवर असलेल्या सरकारच्या काळात गेल्या ११ महिन्यात कर्मचाऱ्यांची जवळपास ९६० कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे पण पहा ~  Employee DA Arrears : सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी... आता तुम्हाला महागाई भत्ता थकबाकीवर मिळणार आयकर सूट! पहा सविस्तर

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची देणी थकित! 

एसटी महामंडळाच्या ट्रस्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला उपदानाचा आणि भविष्य निर्वाह निधीचा पैसा जमा केलेले नसल्याने या काळातील उपदानाचे तसेच भविष्य निर्वाह निधी मधील रकमेचे व्याज देखील बुडाले आहे.

थकित देणीमध्ये उपदान,भविष्य निर्वाह निधी आणि एसटी महामंडळाच्या बँकेच्या थकबाकीचा समावेश आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या उपदान आणि भविष्य निर्वाह निधीचा तब्बल 800 कोटी रुपयांचा यामध्ये समावेश आहे.

MSRTC employees news

MSRTC मधील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावी अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून केली जाते आहे. आता महाराष्ट्र सरकार आता यावर सकारात्मक निर्णय घेईल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय 60 वर्ष संदर्भात मोठी अपडेट्स येथे पहा

60 वर्षे सेवा निवृत्ती वय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment