New Education Policy : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.शिंदे- फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत त्यांचा ताण कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
परिक्षा पध्दती पुन्हा सुरू होणार!
महाराष्ट्र शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे.
नापास विद्यार्थ्यांची दोन महिन्यांत पुनर्परीक्षा
राज्य शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित केली आहे.
Education exam new rules
पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे.शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल.
सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.