Old pension news : कर्नाटक काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास पुन्हा “जुनी निवृत्तीवेतन योजना” लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या निवृत्तीवेतन योजनेस संसदेतच विरोध केल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन साठी अनुकूल नाही असा प्रचार विरोधक करत होते.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
कर्नाटकात सुमारे नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत.हिमाचल प्रदेशप्रमाणेच काँग्रेसने प्रचारात जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर भर दिला जात होता.हिमाचल प्रदेशात जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आणि त्यांची मते काँग्रेसला मिळाली होती.कर्नाटक राज्यातही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने भाजपची कोंडी केली होती.
कर्मचारी व विरोधकांकडुन जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा मुद्दा प्रचारात तापविला जाईल याचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्याकरिता समिती नेमली होती.
Old pension news
कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झालेला असून , यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त 73 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे 115 उमेदवार , जेडिएस पक्षाचे 30 उमेदवार निवडून आले आहेत 06 अपक्ष उमेदद्वारांनी बाजी मारली आहे. कॉग्रेस पक्षाने दिलेल्या वचनानुसार आणखी एका राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे.
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याचा डीए फरक