HRA Allowance News : औरंगाबाद जिल्हा परिषद पाठोपाठ आता पालघर जिल्हा सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बरोबरच घरभाडे भत्त्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण झालेली असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठे असंतोष किंवा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर बघूया सविस्तर प्रकरण काय आहेआहे?
घरभाडे भत्ता बंद ठराव मंजूर
पालघर जिल्हा परिषदेसाठी शिक्षण हा विषय प्राधान्यक्रमावर आहे. दिनांक १६ जून रोजीच्या सर्वसाधारण समिती सभेत शाळा क्षेत्र मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सभागृहाच्या वतीने एकमताने मंजुरी देण्यात आली. यापुढे जे शिक्षक आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले आहे.
पालघर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला अध्यक्ष, उपाध्याक्ष पंकज कोरे, सर्व विषय समिती सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, सर्व विभागप्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यालय म्हणजे काय?
शाळेच्या ठिकाणापासून आठ किलोमीटर परिघाच्या क्षेत्राला मुख्यालय म्हटले जाते. जे शिक्षक मुख्यालय ठिकाणी वास्तव्य करतील ते शिक्षक घरभाडेभत्ता मिळण्यास पात्र राहतील, अशी माहिती प्रशासनकडून देण्यात येते.
दरम्यान फक्त मुख्यालय राहण्याची सक्ती शिक्षकांनाच केली जात असल्यामुळे शिक्षक वर्गामध्ये मोठी नाराजी आहे त्याचबरोबर फक्त जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाच याबाबत विचारणा करण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
फक्त जिल्हा परिषद शिक्षकच डोळ्यावर का?
संस्थेचे जे कर्मचारी आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना याची कोणताही सक्ती केलेली नाही कारण की संस्था ह्या राजकारणी लोकांच्या असतात त्याशिवाय ग्रामसेवक तलाठी आरोग्य सेवक यांना सुद्धा मुख्यालय राहण्याची शक्ती न करता शिक्षकांवरती दबाव टाकल्यामुळे शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज व्यक्त केली जात आहे
पालघर जिल्ह्य़ात आहेत ५१२७ शिक्षक
पालघर जिल्हा परिषद प्राथमिक विभागात ५१२७ शिक्षक कार्यरत आहेत. मुख्यालय वास्तव्य करणारे अंदाजे कर्मचारी संख्या ३९२४ आहे. तर मुख्यालय वास्तव्य अंदाजे न करणारे कर्मचारी १२०३ असून मूळ पगाराच्या सुमारे आठ ते नऊ टक्के रक्कम घरभाडेपोटी या शिक्षकांना मिळते.
खुशखबर… महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार महागाई भत्ता वाढ !