Salary account : सेव्हिंग अकाऊंट विरुद्ध सॅलरी अकाउंट अभ्यास करायचा म्हटलं तर पगार किंवा सॅलरी अकाउंट असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त 10% लोकांनाच त्याचे फायदे माहिती आहेत.विशेष म्हणजे पगार घेणारे देखील अनभिज्ञ आहेत.पाहूया सविस्तर माहिती
Salary account benefits
झिरो बॅलन्स अकाउंट
सॅलरी अकाऊंटला झिरो बॅलन्सची सुविधा मिळते.जी अन्य बँकांमध्ये शहरांनुसार असते.सॅलरी अकाऊंटला मिनिमम बॅलन्स मेन्टेन करण्याची गरज नाही. रेग्युलर अकाऊंटला मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड भरावा लागतो.
कर्ज आणि कर्ज शुल्क
तुमचे पगार खाते असल्यास कर्ज मिळणे सोपे आहे कारण तुमच्या नियमित पगारामुळे बँकेला सुरक्षा मिळते.गृहकर्ज,वाहन कर्ज आणि एक्सप्रेस क्रेडिट कर्जावरील सवलत उपलब्ध असेल आणि त्यानंतर पुनरावलोकनाच्या अधीन राहून ती सुरू ठेवली जाईल.
क्रेडिट कार्ड ऑफर
तुमच्या बचत खात्यासह क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता पगार खात्यापेक्षा कमी आहे.बँक तुमच्या पगारावर अवलंबून क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि क्रेडिट कार्ड मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे.
कर्मचारी पगार खाते महत्त्व
मोफत ऑनलाइन व्यवहार
काही बँका त्यांच्या ग्राहकांना पगार खात्यावर मोफत ऑनलाइन व्यवहाराची सुविधा देतात.पगार खात्या अंतर्गत NEFT आणि RTGS ची सुविधा विनामूल्य असते.पगार खात्यावर IMPS सुविधा देखील असतात.
मोफत विमा सुविधा
पगार किंवा सॅलरी खाते असेल तर खातेधारकांना बँकांकडून 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा मिळतो.
Disclaimer – शासनाचा कोणताही जीआर नाही आहे की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे.असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही.प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.(संदर्भ दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय)
सर्वाधिक सॅलरी अकाउंट चे फायदे देणारी बॅंक येथे पहा