OPS committee : पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिकारी महासंघाने हाती घेतलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, निवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी श्री.सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज दि.९ मे, २०२३ रोजी जुनी व नवीन पेन्शन योजनेसंदर्भात तुलनात्मक मांडणी करण्यासंदर्भात महासंघाला पुनश्चः पाचारण केले होते.
Old pension committee Maharashtra
बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकारी महासंघाने सर्वांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी,याबद्दल आग्रही मांडणी केली. जुन्या पेन्शनच्या तुलनेत आर्थिक लाभ व सामाजिक सुरक्षा या बाबी समोर ठेवून, नवीन पेन्शन योजनेमध्ये उचित बदल करण्यासंदर्भात सूचना मांडाव्यात,असे समितीने आवाहन केले.
नवीन पेन्शन योजना लागू करताना अपेक्षित केल्याप्रमाणे, प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच नवीन पेन्शनधारकांमध्ये भविष्यातील आर्थिक सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने, रोखेबाजारातील गुंतवणूकीशी संबंध जोडल्यामुळेच नवीन पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनामध्ये घट येते,या व इतर बाबतची कारणमिमांसा बैठकीत चर्चिली गेली.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
नवीन पेन्शन योजनाधारकांना भविष्यात जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी आतापासूनच करावयाचे आर्थिक नियोजन व त्यासंदर्भात इतर राज्यांतील जुन्या पेन्शन धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन अधिकारी महासंघाने समितीला प्रस्ताव सादर केला.त्यात NPS धारकांच्या मोठ्या प्रमाणात निवृत्तीचे लाभ हे प्रत्यक्षात वर्ष २०३४ नंतरच द्यावयाचे असल्याने, शासनाने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात एक स्वतंत्र विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून निवृत्तीवेतनापोटी शासनावर अचानक मोठा आर्थिक भार येणार नाही.
ओल्ड पेन्शन योजना लागू करा अन्यथा पुन्हा अंदोलन
बैठकीच्या समारोपात, समितीने महासंघाच्या निवेदनाचा सकारात्मक विचार करुन सर्वांना जुनी पेन्शन लागू करणेबाबत अथवा जुन्या पेन्शन इतकेच लाभ देण्याबाबत आपला अहवाल दि. १४ जून २०२३ पूर्वीच शासनाला सादर करावा,त्यायोगे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेसाठी पुनश्चः संप करण्याची वेळ येऊ देऊ नये, हे सुध्दा अधिकारी महासंघाने आग्रहीरित्या प्रतिपादित केले.
राजपत्रित महासंघाचा जुनी पेन्शन समितीस सादर प्रस्ताव येथे पहा