2000 Note : आरबीआयने म्हटले आहे की आता 2,000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत.पण तुमच्याकडे असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. या कायदेशीर निविदा सुरू राहतील. तुम्ही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता. आरबीआयने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.
RBI 2000 रुपये के नोट को चलन से वापस ले लेगा लेकिन यह वैध मुद्रा बना रहेगा। pic.twitter.com/iZjYXJ5Dfx
— ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2023
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसरी नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
दोन हजार रुपये नोट झाली बंद
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे.
2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.
फक्त 10 मिनिटात मिळवा व्हॉट्सॲप वर मिळवा 10 लाख रूपये कर्ज