Income tax : आयकर विभाग करचोरी पकडण्यासाठी मोहीम राबवत आहे.विभाग सर्व ITR परतावा आणि गुंतवणुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत आहे.सध्या आयकर विभागाने छोट्या बचतींवर ‘बेनामी ठेवी’ पकडल्या आहेत.याकडे विभागाचे बारीक लक्ष आहे. या अशा ठेवी आहेत ज्यांचा ITR Return मध्ये कुठेही उल्लेख नाही.
Income tax notice on savings
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार इन्कम टॅक्स विभागाने लहान बचत योजनांवरील 50 लाखांहून अधिक गुंतवणुकीची तपासणी केली आहे.किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून या ठेवी आहेत.
लहान बचत योजना किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या आयकराच्या तावडीत अनेक लोकांच्या ‘बेनामी ठेवी’ आहेत. यासाठी आयकर विभाग आयटीआर रिटर्नशिवाय 1 कोटींहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस पाठवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही गुंतवणूक अल्पवयीन आणि मुलांच्या नावावर करण्यात आली आहे. आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने 150 जणांना नोटिसा पाठवल्या आहेत.
यांना पुन्हा KYC करावी लागणार
आयकर विभागाच्या अहवालानुसार, प्राप्तिकर विभागाने पोस्ट ऑफिसना त्यांच्या खातेधारकांचे केवायसी (नो युवर कस्टमर) पुन्हा पडताळण्यास सांगितले आहे.यामध्ये अल्पबचत योजनेचे ते गुंतवणूकदार आहेत.
ज्यांनी 10 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक केली आहे. माहितीनुसार,गुंतवणूकदारांना कमी जोखीम,उच्च जोखीम आणि गंभीर जोखीम या श्रेणींमध्ये टाकून त्यांची चौकशी केली जाईल.
या पाच व्यवहरामुळे येऊ शकते Income tax नोटीस
एनआरआय आणि एचएनआय म्हणजेच अनिवासी भारतीय आणि उच्च निव्वळ मूल्य असलेल्या व्यक्ती म्हणजेच ज्यांचे उत्पन्न खूप जास्त आहे. ते या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.
नुकतेच पोस्ट विभागाने एक मास्टर परिपत्रक जारी केले होते. परिपत्रकानुसार, टपाल विभागाने KYC नियमांचे योग्य प्रकारे पालन न करणाऱ्या सर्व खाती गोठवण्यास पोस्ट कार्यालयांना सांगितले होते.
आपले पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न येथे पहा