Old pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बदलांसाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने 9 जून रोजी स्टाफ साइड नॅशनल कौन्सिल ‘जेसीएम’च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे.
जुनी पेन्शन अभ्यास समिती बैठक
केंद्र सरकारच्या मोठ्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी समितीला स्पष्टपणे सांगितले आहे की, कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनशिवाय दुसरे काहीही नको आहे. सदरील समस्येचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘NPS’ योजना रद्द करणे आणि ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करणे हा आहे.
जुनी पेन्शन अभ्यास समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या बाजूने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे. याशिवाय चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांचा विचार करुन अंतिम अहवाल तयार होईल असे आश्वासन दिले आहे.
OPS Committee new updates
राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीला विद्यमान NPS योजनेचा आढावा घेण्याची आणि त्याची रचना आणि कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज आहे का हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बैठकीला सी. श्रीकुमार, सदस्य, सुकाणू समिती, राष्ट्रीय संयुक्त कृती परिषद (NJCA) आणि शिवगोपाल मिश्रा, सचिव, स्टाफ साइड नॅशनल कौन्सिल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.एआयडीईएफचे सरचिटणीस श्रीकुमार म्हणाले, वित्त सचिवांसोबत बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी कर्मचारी संघटनांनी स्वतंत्र बैठक घेतली होती.
कर्मचारी संघटना व अभ्यास समिती यांच्या बैठकीतील ठळक मुद्दे येथे पहा