Dearness allowance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी काल आपल्याला मिळाली होती सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 4% ची वाढ करण्यात आलेली आहे.
मात्र इतर खालील सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्यात अनुक्रमे 16 % आणि 9 % महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे, बघूया सविस्तर
पाचवा वेतन आयोग कर्मचारी डीए
असुधारित वेतन संरचनेत म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ५ व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३९६% वरुन ४१२% करण्यात यावा.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
सहावा वेतन आयोग कर्मचारी डीए
असुधारित वेतन संरचनेत म्हणजे ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा सुध्दा सुधारणा करण्यात आली आहे.
सहाव्या वेतन आयोग अंतर्गत सामाविष्ट कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ६ व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २१२% वरून २२१% करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.
DA allowance news
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खचीं टाकण्यात येणार आहे.
सर्व महागाई भत्ता शासन निर्णय येथे डाऊनलोड करा