Bank Jobs CIBIL Score : अनेकदा आपण कर्ज घेताना आपल्याला सिबिल स्कोअर विचारला जातो किंवा अन्य आर्थिक कामांसाठी आपला सिबिल स्कोअर पाहिला जातो. परंतू आता तुम्ही बँकेत नोकरीसाठी तयारी करत असाल, तर तुम्हाला फक्त अभ्यासच नाही तर सिबिल स्कोअर देखील चांगला ठेवावा लागणार आहे.
Cibil score for bank jobs
बँकिंग भरती एजन्सी आयबीपीएस (IBPS) ने उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेमध्ये चांगल्या CIBIL स्कोअरची अट देखील लागू केली आहे, म्हणजेच ज्यांचा CIBIL स्कोर 650 पेक्षा कमी आहे, त्यांना नोकरी मिळणार नाही.
सिबिल स्कोअर 650 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करत असाल, तर आता फक्त पात्रता किंवा मेहनत करून चालणार नाही, तर आता तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या credit score कडे लक्ष द्यावे लागेल.
काय आहे नवीन नियम?
बँकिंग रिक्रूटमेंट एजन्सी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता म्हणून सिबिल स्कोअर जोडला आहे.
आता अर्जदाराचा CIBIL Score 650 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक असणार आहे अन्यथा आपले ऑफर लेटर रद्द होऊ शकते.IBPS च्या नवीन अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांचे सिबिल स्कोअर 650 पेक्षा कमी आहे त्यांना सरकारी बँकेत नोकरी मिळण्यात अडचणी येणार आहे.
Credit card online check
RBI आणि IBPS ने लिपिक अधिसूचनेत नवीन कलम जोडले आहे. त्यात असे म्हटले आहे की बँकेत नोकरीसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचा चांगली क्रेडिट हिस्ट्री असणे आवश्यक आहे.
थोडक्यात नोकरीत रुजू होताना क्रेडिट स्कोअर 650 च्या वर असावा.अधिसूचनेत पुढे असे म्हटले आहे की, IBPS आणि इतर बँक परीक्षांसाठी प्रत्येक उमेदवाराला CIBIL स्कोअर आणि सिबिल स्कोअर कसा तपासायचा हे पण माहिती असायला हवे.
आपला सिबिल स्कोअर का कमी होतो? कसा वाढेल cibil score येथे पहा