GovernmentState employees : राज्य सरकारी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांकरिता निमंत्रित करण्यात येणाऱ्या अभ्यागत अध्यापकांच्या मानधनात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.आजच्या शासन निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अभ्यागत अध्यापकांच्या मानधनाचे सुधारित दर दिनांक ०१ एप्रिल, २०२३ पासून लागू होतील.
‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानतात वाढ
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / औषधनिर्माणशास्त्र / हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी/ व्यवस्थापन महाविद्यालये/ तंत्रनिकेतने या संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित करून अध्यापन/ मार्गदर्शनाकरिता त्यांच्या सेवा वेळोवेळी प्राप्त कराव्या लागतात.
अभ्यागत अध्यापक निमंत्रित करण्यापूर्वी संस्थेतील संबंधित विद्याशाखेतील सर्व कार्यरत शिक्षकांना प्रमाणकांनुसार शैक्षणिक भार दिला आहे.सेवानिवृत्त अध्यापक वा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित उद्योग क्षेत्रातील/ व्यवसायातील अनुभवसंपन्न व्यक्तींना,तासिका तत्त्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात यावे.
Government employees latest news
सेवा प्रवेश नियमांतील तरतुदीनुसार विहित करण्यात आलेली किमान शैक्षणिक अर्हता व अनुभव अभ्यागत अध्यापकांनी धारण करणे आवश्यक असेल.तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी कमाल ९ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येईल.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
सदर कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.तासिका तत्वावरील कोणत्याही उमेदवारास एकाच महिन्यात त्यांच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरूवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा जास्त मानधन द्यावे लागू नये,याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांची असेल.
अध्यापक नेमणूक पध्दत
तासिका तत्त्वावरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्ती असून त्यामुळे नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी करणार नाही.तसेच,नियमित सेवेच्या कोणत्याही हक्कांची मागणी करणार नाही”असे संबंधित अध्यापकाकडून रू.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्यात यावे.
अध्यापक पगारात होणारी वाढ व शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि तासिका तत्त्वावरील मानधनाचे प्रदान याबाबत अनियमितता आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/ संचालक यांची राहील.
NPS धारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतन नमुना फॉर्म pdf येथे डाऊनलोड करा