7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी ‘हे’ भत्ते वाढविण्याच्या तयारीत!

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून सातव्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance),शहर भत्ता (City Allowance) वाढवण्यात येणार आहे.यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) वाढणार आहे. 

Central Government allowances

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते,असे म्हटले जात आहे.

DA Hike updates

7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दर 6 महिन्यांनी DA वाढ होते. 24 मार्च 2023 रोजी,जानेवारी 2023 चा महागाई भत्ता (DA वाढ) 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता आता 42% झाला आहे.गेल्या वर्षी जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीतील CPI-W डेटा वापरून ही वाढ मोजण्यात आली.तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या दराने महागाई वाढली आहे त्यानुसार महागाई भत्ता आणखी 4% वाढेल.

HRA hike news

मोदी सरकार लवकरच HRA वाढवू शकते.2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार घरभाडे भत्ता वाढवू शकते.जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला,तर अशा परिस्थितीत सरकार एचआरएमध्ये सुधारणा करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 % आहे. 

हे पण पहा ~  RCB vs MI live : आज IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना; मोबाईल वर लाईव्ह 'येथे' पाहता येणार

जुलै 2021 मध्ये, जेव्हा केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे गेला होता,त्यानंतर सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा HRA मध्ये सुधारणा करणार आहे.सरकार यावेळी घरभाडे भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होईल वाढ येथे पहा

पगार वाढ

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

3 thoughts on “7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी ‘हे’ भत्ते वाढविण्याच्या तयारीत!”

Leave a Comment

%d