EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ चे सदस्य आहात तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील नोकरदार लोकांचे काही पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) जमा केले जातात. यावर सरकार वेळोवेळी लोकांच्या खात्यात व्याजाचे पैसे टाकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ लवकरच PF खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करू शकते. ईपीएफओ 30 ऑगस्ट 2022 पर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकते अशी बातमी आली होती. पण तसे झाले नाही. त्याचबरोबर हे व्याजाचे पैसे हस्तांतरित झाल्यामुळे खातेदारांच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात किती दिवसांत पैसे खात्यात येणार आहेत.
तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही आता शिल्लक तपासण्यासोबतच तुम्हाला पीएफमध्ये जमा केलेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजाचीही माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पासबुक मिळवायचे असेल तर तुम्ही त्याच्या पासबुकची PDF फाइल डाउनलोड करू
पेन्शनधारकांच्या सुविधेसाठी मोठा बदल
कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ईपीएफओ ने आपल्या वेबसाईटमध्ये काही सुधारणा केली आहे, जेणेकरून कर्मचार्यांना पीएफ शिल्लक तपासण्यात कोणतीही अडचण होणार नाही. याआधी, लोक पासबुकमध्ये फक्त एकूण रक्कम पाहण्यास सक्षम होते, पण आता तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा पैशांवर किती व्याज मिळाले आहे हे देखील बघता येणार आहे. याशिवाय तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये किती काम केले आहे, हे देखील पाहू शकता.
मिस्ड कॉल च्या माध्यमातून जाणून घ्या
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला पीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल.
दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता
तुमची ईपीएफ शिल्लक कशी तपासायची?
तुमची ईपीएफ शिल्लक कशी तपासायची?ऑनलाइन शिल्लक तपासण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा
- सर्व प्रथम epfindia.gov.in वर ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- स्टेप लॉगिन केल्यावर तुमच्या समोर एक ड्रॉप डाउन दिसेल, त्यात वेगवेगळे पीएफ खाते पर्याय असतील. वर्तमान सदस्य आयडी निवडा.
- आता तुमच्या समोर पासबुक उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचे आणि नियोक्ता दोघांचेही मासिक योगदान पाहू शकता.
- यासह, एकूण शिल्लक देखील दिसून येईल. व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे देखील दर्शवेल.
- जर ईपीएफओने व्याज जमा केले असेल, तर ते येथे दिसून येईल.
Ppf