Retired Employees : 30 जून रोजी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देऊन निवृत्तीवेतन मिळण्याबाबतच्या प्रकरणी वित्त विभागाने अभिप्राय दिलेले आहेत.सदर प्रकरणी सद्यस्थितीत शासनाचे कोणतेही धोरण ठरलेले नसून शासनाने कोणतेही नियम निगमित केलेले नाहीत.
Retired employees Increments
माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ च्या रिट पीटेशन नंबर 1881 ऑफ 2023 व इतर अनेक याचिका मधील न्याय निर्णयामुळे दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक जुलै रोजी च्या वेतन वाढीसाठी न्यायालयात दाद मागावी लागणार नाही.
30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढीचा लाभ घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांमध्ये विचारणा केली असता सदर कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागांकडून दि.22.07.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन परिपत्रकाच्या आधारे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येणार नाही.
कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ
मा.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या दाखल याचिका विरुद्ध देण्यात आलेल्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 मध्ये नमूद तरतुदी मध्ये अद्याप कोणत्याही सुधारणा करण्यात आलेले नाहीत.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
थोडक्यात 01 जुलैची आगाऊ वेतनवाढी प्रकारणांमध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरण बेंगलोर यांच्या दि.18 डिसेंबर 2019 व कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या दि.22 ऑक्टोबर 2020 च्या आदेशाच्या अंमलबजावणीस मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.05.04.2021 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.
दि. 30 जून वाढीव वेतनश्रेणी शासन परिपत्रक येथे पहा – शासन निर्णय
आता यापूर्वीच्या आदेशानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ विनंती करणारे पत्र द्यावयाचे असून त्यानंतर पूर्वीचे फक्त तीन वर्षापर्यंतची थकबाकी सह इतर निवृत्तीवेतन विषयक सर्व लाभ मिळणार आहेत.
सरकारी कर्मचारी निवृत्ती वय 60 होणार; पहा सविस्तर