Good news : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी मार्च महिन्यात जुन्या पेन्शन साठी संपावर गेले होते.परिणामी त्यांच्या संप काळातील अर्जित रजेचा प्रश्न निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांचा अजून मार्च महिन्याचा पगार झालेला नाही.पण इतर ठिकाणी मात्र एप्रिल महिन्याच्या पगारासंदर्भात महत्त्वाची अपडेट्स आली आहे.
State employees news
झारखंडमधील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आगामी सणांआधी राज्यातील हेमंत सोरेन सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन एप्रिल महिन्यापूर्वीच देण्याचा निर्णय घेतला आहे.
झारखंड सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार 20 एप्रिललाच दिला जाईल.ईद-उल-फित्रच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने झारखंड ट्रेझरी कोड 2016 च्या नियम 139 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
ईद पुर्वी होणार पगार
झारखंडमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच बिहारमधील कर्मचाऱ्यांचे वेतन एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे.बिहार सरकारने देखील यावेळी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेळेपूर्वी पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.दोन्ही राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे आभार मानले आहेत.
42% महागाई भत्ता वाढ तारिख ठरली! पहा या दिवशी वाढणार डीए
अजून मार्च महिन्याचा पगार झालेला नाही.