Accidental insurance : राज्य शासकीय कर्मचान्यांकरिता संपूर्णतः कर्मचान्यांच्या वर्गणीवर आधारित अशी “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” दि.०४.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दि. १८.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्ये मान्यता देण्यात आली.
समुह अपघात विमा योजना 2023
योजनेची व्याप्ती वेळोवेळी वाढविण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वन सेवेतील, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा व राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विविध घटकांचा समावेश केलेला आहे.सदर अपघात विमा योजनेखाली गट-अ ते ड मधील अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता रु.३००/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये रुपये 10 लाख ही समान राशीभूत विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Government employees insurance
दि.01 एप्रिल 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sur Insured) यामध्ये वाढ करण्यात येत असून ‘व सदर वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात आली आहे.
कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ वेतन श्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मूळ पदाचा विचार न करता अपघात विमा योजनेची वर्गणी घेण्यात येवून त्याप्रमाणे लाभ अनुज्ञेय कराण्यात येणार आहे.
धक्कादायक…जुनी पेन्शन लागू झाली तरी मिळणार नाही हे पैसे
Employees Accidental insurance 2023
माहे फेब्रुवारी महिन्याची वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच,ज्या कर्माचान्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजने Employees Accidental insurance 2023 मध्ये समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.