तुम्हाला माहित आहे का तुमच्या ग्रामपंचायतला किती पण येतो दरवर्षी?आलेला पैसा कुठे खर्च होतो? तुम्हाला कोणत्या स्कीमचा लाभ मिळतो.पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.
Gram panchayat kamacha
तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.
रस्ते,पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे
गावाचं रिपोर्ट कार्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी ई-ग्राम स्वराज’ या मोबाईल एप्लिकेशनचं लोकार्पण केले होते
यावेळी ते म्हणाले होते,”या अॅपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती उपलब्ध असेल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय सुरू आहे, काय काम सुरू आहे, ते कुठवर आलं आहे, सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकेल. ”
ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला
यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ई-ग्राम स्वराज नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
ग्रामपंचायत यादी 2023 येथे पहा
त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities हा. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असते.त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.
आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.
त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
- त्या नंतर Cash Book Report या पर्यायावर क्लिक करा
- पुढील स्टेप अशी आहे की, नंतर Cashbook Report हा पर्याय निवढा
- त्या नंतर Month Wise या पर्याय वर क्लिक करा.
- परत खाली या आणि खालील स्टेप करा.
- Month Wise या पर्याया वर क्लिक करा.
- नंतर Financial Year या पर्याय सिलेक्ट करा
- त्या नंतर तुमचे राज्यं म्हणजे Stateनिवडा.
- त्या नंतर Accounting Entityवर Village Panchayatया पर्याय वर क्लिक करा, व तुमचे गाव निवड, किंवा तुमच्या गावाला जी ग्राम पंचायत आहेत टी ग्राम पंचायत निवढा.
- त्या नंतर खाली तुमचं जिल्हा District वर सिलेक्ट करून जिल्हा निवडा.
- नंतर Block वर क्लिक करून तालुका निवडा.
- नंतर Village वर क्लिक करून गाव निवडा.
- त्या नंतर Captcha Answer मध्ये समोर दिसत असलेला अंक/शब्द टाका व Get Report या बटणवर क्लिक करा.
- केल्यानंतर त्या महिन्याचा PDF रिपोर्ट तुमच्या समोर येईल तो सेव्ह करा
- व तपासा आपल्या ग्रामपंचातीच्या कामाचे प्रत्येक महिन्याच्या कामाचे सविस्तर तपशील, तुमच्या समोर येईल.
- त्यामध्ये तपशिलवार जमा व खर्च याची माहिती दिसेल. आणि गावात कुठल्या कामावर किती व कसा खर्च केला तेही दिसेल.
- मग तुम्हाला सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला विकास समोर येईल.
ग्रामपंचायत निधी उरला तर काय?
ई-ग्राम स्वराज एपवर तुम्हाला अशी अनेक गावं सापडतील, ज्यांना मिळालेल्या निधीपैकी 30, 40, ते 50लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करता आली नाही.
ग्रामीण ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजावे.पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकली नाही असा होतो.
आपल्या ग्रामपंचायतचा योजना यादी व हिशोब येथे पहा