Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे व्यवहार तर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Notice : आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोताकडून प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केले गेला आहेत.आता करपात्र वर्गवारीतील प्रत्येक उत्पन्नाची माहिती उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री

प्रॉपर्टी रजिस्ट्रारला 30 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेची कोणत्याही गुंतवणूकिची किंवा विक्रीची माहिती टॅक्स अधिकाऱ्यांना द्यावी लागते.रिअल इस्टेट मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना करदात्यांना आपल्या कॅश ट्रान्सझॅक्शनची माहिती Income Tax फॉर्म 26AS मध्ये द्यावी लागेल.

बचत खाते ठेव (Bank Cash deposit)

आपल्या बँकेच्या खात्यामध्ये कॅश जमा करण्याची मर्यादा 10 लाख रुपये असते.जर आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.चालू खात्यांमध्ये ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे.

शेअर्स मार्केट व म्युच्युअल फंडस् गुंतवणूक

शेअर्स मार्केट,म्युच्युअल फंड,स्टॉक,बाँड किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपले कॅश व्यवहार एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

हे पण पहा ~  Income tax : बापरे... तुमच्या प्रत्येक छोट्या बचतीवर इन्कम टॅक्स विभागाचे लक्ष! अशी घ्या काळजी
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट (creadit card bills)

CBDT नियमांनुसार,जर आपल्या क्रेडिट कार्डचे बिल म्हणून आपण 1 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे पेमेंट केले तर तर Income Tax विभागाच्या कक्षेत येते.क्रेडिट कार्ड बिल “credit card bills” सेटल करण्यासाठी आर्थिक वर्षात 10 लाख किंवा त्याहून जास्त पैसे भरल्यास ते आयकर विभागाकडे उघड केले पाहिजे.

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp Group

Income tax new service

आता नव्या AIS फॉर्ममध्ये करदात्यांना वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या सर्व उत्पन्नाचा तपशील देण्यात आला आहे.यामध्ये बचत खात्यावरील व्याज उत्पन्न,FD व मुदत ठेवी उत्पन्न,डिव्हीडंट यातून मिळणारे उत्पन्न,Mutual Funds सह सिक्युरिटीज व्यवहारातून मिळणारे उत्पन्न,परदेशातून मिळालेले पैसे आदींचा समावेश आहे.

ITR भरणे सोपे व्हावे यासाठी इन्कम टॅक्स विभागाने AIS आणि TIS सुविधा सुरू केले आहे.यामध्ये करदात्यांना करपात्र रकमेची एकरकमी माहिती मिळते.

आपले आर्थिक वर्षातील सर्व उत्पन्न येथे पहा

इन्कम टॅक्स AIS फॉर्म

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

3 thoughts on “Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे व्यवहार तर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!”

Leave a Comment