Juni pension : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्या घडामोडत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मोठी माहिती समोर आली आहे.
RBI Governor on ops
जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याचे आर्थिक नुकसान होईल,अशाप्रकारे कोणतेही लेखी पत्र किंवा आदेश कोणत्याही राज्यांना दिलेले नसल्याबाबत RTI अंतर्गत विचारलेल्या उत्तरातून उघड झाले आहे.
माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे विधान केले होते.सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी नापसंती दर्शवली आहे.
NPS latest news
यापुर्वी 15 व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह (15th Finance Commission Chairman) यांनी नवीन पेन्शन योजनेची वकिली केली होती.नवी पेन्शन योजना सोडून जुन्या पेन्शन योजनेचा अंगिकार करणे हे घातक असल्याचा दावा त्यांनी केला होता.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
या सर्व घडामोडी वर विचार केला असता जाणीवपूर्वक जुन्या पेन्शन संदर्भात नकारात्मक वातावरण राज्यात आणि देशात काही घटक करत असल्याचे दिसून येते आहे.माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या बाबींचा विचार केला असता जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सरकार वर दबाव वाढला आहे.
आरबीआय कडून माहिती अधिकारात प्राप्त पत्रक येथे पहा