NPS Amount : राज्यातील दुय्यम न्यायालयामध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दिनांक 11 डिसेंबर 2019 पुर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आले आहे.
DCPS NPS amount latest updates
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी तातडीने करण्याकरिता राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकान्यांच्या वेतनातून नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेप्रमाणे (DCPS) नियमाप्रमाणे दरमहा करण्यात येणारी कपात व शासनाचे समान योगदानही थांबविण्यात आले आहे.
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सदरील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आलेला असून 11/12/2019 रोजी च्या झालेल्या बैठकीत याविषयावर सविस्तर चर्चा झाली होती.सदरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS Account मध्ये जमा निधी कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यात वर्ग करण्यासंदर्भात सुद्धा ठराव आणि चर्चा झाल्याचे समोर आले आहे.संवितरण अधिकारी ठाणे जिल्हा यांना असे देण्यात आले आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा
Old pension news
राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यां प्रमाणेच बिनतारी संदेश विभागातील पोलीस अंमलदार व 1129 अधिकारी व इतर विभागातील 4 अधिकारी / कर्मचारी यांनी “जुनी पेंन्शन योजना” लागू करणे बाबत मा.महाराष्ट्र “प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे मूळ अर्ज क्र. ७३९/२०२१, ७४०/२०२१ व ७४१/२०२१ असे दाखल केले होते.सदरील कर्मचाऱ्यांना सुध्दा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कार्यवाही चालू आहे.
जुनी पेन्शन योजना नवीन शासन निर्णय येथे पहा