Old Pension new updates : काँग्रेसकडून कर्नाटक, राजस्थान,हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास पुन्हा “जुनी निवृत्तीवेतन योजना” लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.सर्व ठिकाणी त्यांचे सरकार स्थापन झाले आणि आता आणखी एका राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू होणार!
राष्ट्रीय काँग्रेसने अशीच घोषणा हरीयाणा विधानसभेच्या अनुषंगाने केली आहे.काँग्रेस कडून हरीयाणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजनाचा लाभ पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येईल.त्याचबरोबर 300 युनिट पर्यंतचे विजबिल पुर्णत: माफ करण्यात येईल.सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर अनुदानासह 500/- रुपयांमध्ये देण्यात येईल.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र अपडेट्स
अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात वातावरण तयार होत असून महाराष्ट्र सरकारने सुद्धा यासाठी एक अभ्यास समिती स्थापन केली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर सामाजिक आर्थिक लाभ देण्यात येईल अशी घोषणा सरकारने अंदोलनाच्या काळात केली होती.
जुनी पेन्शन अभ्यास समिती आपला अहवाल जवळपास 15 जूनच्या दरम्यान सरकारकडे सादर करणार असून यामध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा धोरण लागू ! फक्त एवढ्या दिवस घेता येणार रजा