Old pension : काँग्रेसकडून राजस्थान,हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास पुन्हा “जुनी पेन्शन योजना” लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.सर्व ठिकाणी त्यांचे सरकार स्थापन झाले.आता आणखी तीन राज्यात सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
Old pension new updates
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी 13 जून सूचित केले की जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याबाबत पुढील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते आणि अर्थसंकल्पात निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
PTI वृत्तसंस्थेनुसार, NPS Employees युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.नवीन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करण्याची विनंती केली.शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांच्या संभाषणादरम्यान, त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, त्यांना (मुख्यमंत्री) OPS संदर्भात उद्धृत केले आहे.
हरियाणामध्ये जुनी पेन्शन योजना लागू होणार!
राष्ट्रीय काँग्रेसने अशीच घोषणा हरीयाणा विधानसभेच्या अनुषंगाने केली आहे.काँग्रेस कडून हरीयाणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजनाचा लाभ पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येईल.
जुनी पेन्शन अभ्यास समितीची मुदत संपली; आता पुढे काय? मंत्रालयाने अपडेट्स आले समोर!
मध्य प्रदेशमध्ये देणार जुनी पेन्शन
प्रियंका गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्वसामान्यांना पाच आश्वासने दिली आहेत.राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जातील,गॅस सिलिंडर 1000 रुपयांना ऐवजी 500 रुपयांना मिळेल, 100 युनिट वीज मोफत मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वात मोठी घोषणा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात येईल.शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा