Old pension committee : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागे 7 दिवसांपासून संप पुकारला होता.अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आणि सरकारी कर्मचारी संघटनेने आपला संप मागे घेतला.महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात होती.
जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती बैठक
जुनी पेन्शन योजना अभ्यास समितीस दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा स्थानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजने संदर्भात शिफारस / अहवाल शासनास करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
सन 2005 नंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्ती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी आपणास समवेत सखोल विचार-विमर्ष करणे अभ्यास समितीस आवश्यक आहे.
समन्वय समितीला बैठकीचे निमंत्रण
अभ्यास समिती बरोबर चर्चा करण्यासाठी विश्वास काटकर,सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दिनांक ०१/११/२००५ रोजी त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी समन्वय समिती काही उपाययोजना सुचवू इच्छित असेल तर त्याबाबतच्या प्रस्तावाचे समिती निश्चित स्वागत करण्यात येईल,तसेच समन्वय समितीच्या सुचना जुनी पेन्शन अभ्यास समिती नक्कीच सकारात्मक विचार करेल,असे पत्रात सुचवले आहे.
Old pension scheme updates
या सर्व पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन अभ्यास समितीबरोबर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यकता असल्यास सादरीकरण करण्या दिनांक २१/०४/२०२३ शुक्रवार रोजी १२.०० ते ०१.०० वाजता अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), यांचे मंत्रालयातील ५ व्या मजल्यावरील दालनात जुनी पेन्शन प्रस्तावासह कृपया उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकार करतय गॅरेंटेड पेन्शन योजनेचा विचार, पहा काय आहे योजना
1 thought on “Old pension committee : जुनी पेन्शन लागू होणार! अभ्यास समितीकडून कर्मचाऱ्यांच्या संघटनेस चर्चेसाठी निमंत्रण”