Ops srtike leaves : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप” आंदोलन संदर्भाबाबत शासनास नोटीस दिली होती.
Government employees Leave
संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होवू नये असे आवाहन संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये करण्यात आले होते.तरीही संपामध्ये काही कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिनांक २०.३.२०२३ रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा
संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते दिनांक २० मार्च, २०२३ या कालावधीत संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात येणार आहे.
Old pension strike leave
सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४.०१.२००१ च्या आदेशास अपवाद करुन सेवेतील खंड न समजता निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
संप काळातील असाधारण रजा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा