RTE Admission 2023 : शिक्षण हक्क कायद्या 2010 नुसार ग्रामीण व शहरी भागातील वंचित घटकांसाठी खासगी शाळांमध्ये आरक्षित असलेल्या 25 % जागांसाठी 1 मार्च 2023 पासून RTE Admission 2023 सुरू करण्यात येत आहे.
School Admission process 2023
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार (Right To Education) राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया “school Admission process 2023” बुधवारी 1 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे.
मोफत प्रवेश प्रक्रिया संबंधित माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली असून प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आणि कार्यवाहीची देण्यात आली आहे.
RTE Admission Timetable 2023
आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्यासाठी 1 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.पालकांना 17 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
लॉटरी कधी निघणार?
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल.25% आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
RTE Admission 2023 पात्रता निकष व शासन निर्णय येथे पहा
Free RTE Administration 2023 Documents
आरटीईसाठी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक असणार?
Free RTE admission 2023 साठी खालील विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकाना सादर करावी लागणार आहेत.
आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यातयातील खालील एक पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे.
- ड्रायव्हिंग लायसन्स,
- आधार कार्ड,
- घरपट्टी,
- मतदान ओळखपत्र,
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- जन्मतारखेचा पुरावा,
- दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा,
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा,
- अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे,
विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा
RTE Administration 2023 ऑनलाईन अर्ज येथे करा
1 thought on “RTE Admission 2023 : आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवा तेही मोफत! प्रवेश प्रक्रिया सुरू;पहा पात्रता ल लगेच घ्या ॲडमिशन”