Tax Saving Tips : आयकर रिटर्न्स (ITR) भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे.तसतसे पैसे वाचवण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू झाली आहे.ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यांच्याकडे कर बचतीसाठी फार पर्याय नाहीत.पण आपण कोणत्याही गुंतवणूकीशिवाय किंवा विम्याशिवाय टॅक्स वाचवू शकता. जाणून घेऊया
Income tax Rebate
सध्या आयकर देयक 50,000 रुपयांपर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन घेऊ शकतात. याचा अर्थ असा की,आपण काहीही न करता 50,000 रुपयांची बचत करू शकतो.याचा मोठा फायदा म्हणजे केवळ 50,000 रुपयांमुळे टॅक्सेबल स्लॅबवर येणाऱ्या लोकांना होईल.स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे आपले करपात्र उत्पन्न 50,000 रुपयांपर्यंत कमी होते
80C मध्ये मिळणार अधिक सूट
आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आयकर भरणारास 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करसवलत मिळत असते.
How to save Income tax
आयकर कायद्यात वैयक्तिक कर्जाच्या सवलतीची प्रत्यक्ष तरतूद नाही.पण वैयक्तिक कर्जाची गणना आपल्या लायबलिटीच्या श्रेणीत केली जाते,उत्पन्नात नाही.अशा वेळी जर तुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर असेट क्रिएशन (Asset creation) म्हणून केला तर तुम्ही personal loan वरील Tax सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता.”How to save Income tax”
घर खरेदी किंवा दुरुस्ती
तुम्ही वैयक्तिक कर्ज (personal loan) घेतलेले पैसे घराच्या दुरुस्तीसाठी किंवा घर खरेदीसाठी वापरल्यास तुम्ही आयकर सवलतीचा फायदा घेऊ शकता.आयकर कायदा,1961 च्या कलम 24 नुसार,निवासी घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट मिळू शकते.कलम 80C अंतर्गत,जेथे गृहकर्जावरील मूळ रकमेच्या देयकावर दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट घेतली जाऊ शकते तर कलम 24 नुसार, घर बांधण्यासाठी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची तरतूद आयकर कायद्यात आहे.
व्यवसायात गुंतवणूक (Business Investment)
जर वैयक्तिक कर्जाचा (personal loan) वापर व्यवसायात गुंतवणूक म्हणून केला तर तुम्हाला करात सूट मिळू शकते.या प्रकरणात,तुम्ही खर्च म्हणून दाखवून व्याजाचा दावा करू शकता आणि आयकर कमी करू शकता.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
असेट्समध्ये गुंतवणूक (Asset creation)
तुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा वापर स्टॉक्स,दागिने,नॉन रेसिडेंन्शिअल प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी केले तर तुम्हाला याचा फायदा घेता येऊ शकतो पण ज्या वर्षी व्याज फेडले त्या वर्षी सवलत घेता येत नाही.पण जेव्हा तुम्ही आपली संपत्ती विकता, त्यावर्षी तुम्हाला ते क्लेम करता येतो.
आपल्या बचत खात्यात व घरी ठेवा एवढा पैसा नाही तर येईल आयकर विभागाचे नोटीस
1 thought on “Tax Saving Tips : ना गुंतवणूक ना विमा; एका क्लिकवर होईल 50 हजार रुपयांची बचत, ITR भरताना करा हे काम…”