State employees : सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.राज्यातील 12 मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे.
State employees news
सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते तर माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला होता.
महाराष्ट्र शासनाने कामगारांच्या वेतन वाढीचा निर्णय घेतला आहे. माथाडी सहआयुक्तांनी शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता.महाराष्ट्र शासनाने 2 मे रोजी सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याविषयी कामगार आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
खासगी सुरक्षारक्षक वेतनवाढ
बोर्डाच्या या निर्णयाच्या आधारावर खासगी सुरक्षारक्षक कंपन्यांमधील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होणार आहे.सदरील निर्णयामुळे खासगी सुरक्षा कंपन्यांमधील 7 ते 8 लाख सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही मोकळा होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना किती वेतनवाढ मिळणार येथे पहा