7th pay Arrears : सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा हप्ता जुन महिन्यांच्या देयकासोबत अदा करणेबाबत वित्त विभागांकडून 24 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तरी अजूनही थकबाकीची रक्कम बऱ्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.
सातवा वेतन आयोग हप्ते प्रलंबित
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान होत असताना जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांना अजूनही अनेक जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे प्रदान झालेले नाही.
राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी यासंदर्भात महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर केले आहे.
MSRTC Employees news
एसटी कर्मचाऱ्यांची थकीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढ अद्याप प्रलंबित आहे.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे दैनंदिन आर्थिक गणित बिघडले आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग, शासन निर्णय शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांशी संबधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हाट्सॲप गृह जॉईन करा
राज्य शासकीय कर्मचा-यांना 1 जुलै 2022 पासून महागाई भत्याचा दर 34% टक्क्यावरून 38 % करण्याचा निर्णय घेतलेला असून सदर वाढीव 4 सदर शासन निर्णय व कामगार कराराच्या तरतुदीनुसार ST employees यांना लागू करण्यात आलेला नाही.
सदरील 38% महागाई भत्ता थकबाकीसह एसटी कामगारांना जुलै 2022 पासून लागू करण्याची महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सेवानिवृत्ती वय 60 वर्षे संदर्भात मोठी अपडेट्स येथे पहा