CM Relief fund : राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत,आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.अशा परिस्थितीत महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्यभावनेने एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि.१९ एप्रिल २०२३ रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत
राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिक रक्कम देता यादी यास्तव राज्यातील सर्व भा.प्र.से.भा.पो.से,भा.व.से व अन्य अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहे जून, २०२३ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लावला जातो आहे.राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना माहे जून २०२३ च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री राहायता निधीमध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री फंड मदत शासन निर्णय
सदर १ दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन+महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावे.(तीन) वेतन वितरणाच्या वेळी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्या रकमेची नोंद घेण्यासाठी माहे जून २०२३ करिता एक स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यामध्ये वसूल केलेल्या रकमांची नोंद अधिकारीनिहाय/कर्मचारी निहाय घेण्यात येणार आहे.
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार एक दिवसाचे वेतन कपात