Dearness allowance : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 % वाढून एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.आता राज्यात आणखी एका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना DA hike लाभ मिळणार आहे.
महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला!
सविस्तर सांगायचे तर ओडिशा सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % ची वाढ केली.राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए आता 42 % झाला आहे.जो पूर्वी 38 % होता.
राज्यातील सुमारे 7.5 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4 % महागाई भत्ता वाढ मिळणार असून सदरील वाढीव डीए 1 जानेवारी 2023 पासूनच लागू होईल.
जानेवारी 2023 ते ते जून 2023 पर्यंतच्या महागाई भत्त्याची रक्कम थकबाकीची रक्कम रोख स्वरुपात जून महिन्यात तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी प्रतिक्षेतच!
भारतातील जवळपास सर्वच राज्यांनी आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलेली असताना महाराष्ट्रात तर मात्र राज्य सरकारी कर्मचारी अजून सुद्धा महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजून पर्यंत मागे भत्त्याच्या दरात 4% वाढ करण्यात आलेली नाही. जो की केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून देय केलेला आहे.
महागाई भत्ता वाढ व फरक येथे कॅल्क्युलेट करा
mkquadri28@gmail.com Kadri khizer