DA Hike : महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने भेट दिली आहे.केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गिफ्ट मिळाले आहे.
महागाई भत्त्यात झाली 4% वाढ
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारने मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % नी वाढ केली आहे DR मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 % झाला आहे. वाढीव दर जानेवारी 2023 पासून लागू होईल. यासोबतच कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही थकबाकी मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारवर दरवर्षी 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
DA hike latest news
कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सची (CCEA) बैठक शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.यावेळी सरकारने महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.मार्चपासून सरकार वाढीव डीए देणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची थकबाकी एप्रिल महिन्यात दिली जाणार आहे.
38% दराने मिळत आहे महागाई भत्ता
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 38 दराने महागाई भत्ता मिळतो.यावेळी चार टक्के वाढ होणार आहे. त्यानंतर ते 42% पर्यंत वाढणार आहे.
1 जानेवारी 2023 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.मार्च महिन्याच्या पगारात वाढीव मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महागाई भत्ता दरवाढीने पगार किती वाढणार येथे पहा
5 thoughts on “DA hike : खुशखबर… सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ! पहा किती वाढणार पगार”