Old pension : राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून जुनी पेन्शन निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज विधानपरिषदेत दिली आहे.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी (ops) बैठक घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.शिंदे – फडणवीस “जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र” साठी नकारात्मक नाही असंही फडणवीसांनी म्हटले आहे.2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती 2028 मध्ये होणार आहे.
हिवाळी अधिवेशनात फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेत?
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार नसल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. 2005 मध्ये जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme Maharashtra) बंद झाली आहे.राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली,यातून राज्य दिवाळखोरीत निघेल,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार
राज्यात अंदाजे 16 लाख 10 हजार शासकीय कर्मचारी आहेत. जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीवर 50 ते 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची आजची विधिमंडळातील घोषणा येथे पहा