DA Allowance News : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे 9% वाढ लागू करण्यात आली आहे.आता उर्वरित कर्मचाऱ्यांना सुध्दा महागाई भत्त्या वाढवला जाणार आहे.
महागाई भत्त्यात 9% वाढ
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, व्यय विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.१/३(१)/२००८-E.II (B), दि. १०.०४.२०२३ ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि. ०१.०१.२०२३ पासून लागू करण्यात आलेली ९% (२१२% ते २२१%) महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.०१.०१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील.
DA allowance hike 9%
महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि. ०१.०१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. ०१.०१.२०२३ पासून २२१% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम
रोखीने अदा करण्यात यावी. सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०६०६१६३१४८६५१२ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
खुशखबर.. कर्मचाऱ्यांना मिळणार 10% वाढीव पेन्शन भत्ता