Government employees : राज्य सरकारने नुकतीच महागाई भत्ता 34 % वरुन 38 % केला आहे.माहे फेब्रुवारी पेड़ इन मार्च 2023 शालार्थ देयका सोबत सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता महागाई भत्त्याच्या फरकासह सादर करणेबाबत आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.
Government employee’s updates
शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतूदीनुसार व दिनांक 10/02/2023 रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये महागाई भत्ता वाढ व फरक सुविधा सुरू झालेली आहे.शालार्थ प्रणालीच्या होम पेज वर युजर मॅन्युअल देखील उपलब्ध आहे. देयके ऑनलाईन महागाई भत्त्यासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता काढण्यात येणार आहे.
शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.01//02/2023 नुसार ऑफलाईन काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.शालार्थ प्रणालीमध्ये नोंद घेण्यात येईल, तसेच उपलब्ध तरतूद 100% खर्च होईल, याची दक्षता घेण्याचा सुचना दिल्या आहेत.
DA Arrears updates
सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की माहे फेब्रुवारीच्या नियमित वेतन देयका सोबत वाढीव महागाई भत्ता फरक (DA Arrears updates) सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्त्या (7th pay commission installment) ची देयक समाविष्ट करून सदर फेब्रुवारी चे नियमित वेतन देयक दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून हार्ड कॉपी या कार्यालयास सादर करावे लागणार आहे.
सरकारी कर्मचारी,पगार,महागाई भत्ता,शासन निर्णय,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांशी संबंधित माहितीसाठी व्हॉट्सअप गृप जॉईन करा
7th pay commission Arrears
शालार्थ वेतन प्रणाली ही संपूर्ण महाराष्ट्र साठी लागू असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील वरील प्रमाणे देयके सादर करावी लागणार आहे.
माहे फेब्रुवारी पेड इन मार्च 2023 या मासिक वेतनासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाचे पहिला व दुसरा हप्ता (7th pay commission Arrears) तसेच वाढीव महागाई भत्त्याचा फरक सदर वेतनात मिळणार आहे.
महागाई भत्ता पगार वाढ व मिळणारा फरक व शासन परिपत्रक येथे पहा
1 thought on “Government employees : मोठी बातमी..फेब्रुवारी पेड़ इन मार्च 2023; सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता, DA वाढ शासन निर्णय”