Home loan subsidy : शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “घरबांधणी अग्रिम” या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी एकूण रु. 2 कोटी 38 लाख (अक्षरी रुपये दोन कोटी अडतीस लाख) इतक्या निधीचे खालील अटींच्या अधीन राहून वितरण करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी गृहबांधणी अग्रिम 2023
घरबांधणी अग्रिम संबंधित अर्जदारास वितरीत करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची / कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्ण खात्री करुन घ्यावी.तसेच अर्जदार सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्याच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसुली होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी लागणार आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे अनुदान उपलब्ध असेपर्यंत या अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम कोषागारातून काढण्यात यावी.तसेच कोषागारातून रक्कम काढल्यानंतर ती रक्कम तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्यात येणार आहे.
घरबांधणी अग्रिम संबंधित सविस्तर माहिती व शासन निर्णय येथे पहा
ज्यांचा सेवकाल ३ वर्षे सेवक,१२वर्षे ४ महिने पगारी काळ. त्यांना लोन घेऊन घर बांधता आले नाही .कारण कालावधी कमी,त्यांच्यासाठी शासनची काय उपाय योजना आहे.