देशातील कापूस बाजाराचे लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. सुतगिरण्या आणि कापड उद्योगाने अर्थमंत्र्यांकडे कापूस आयातीवरील 11% शुल्क काढण्याची मागणी केली.देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीन दबावात असताना,आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर वाढले.
Kapus bajar bhav 2023
कापुस निर्यात अनुदानाची मागणी
देशातील शेतकऱ्यांना या परिस्थितीत चांगला दर मिळण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्याची गरज आहे.तसंच देशातून कापूस, सूत आणि कापड निर्यातीसाठी अनुदान आणि करात सुट द्यावी, अशीही मागणी शेतकरी करत आहेत.देशातून सूत आणि कापड निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल,असंही जाणकारांनी सांगितले.
देशातील शेतकऱ्यांना मात्र दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.कापूस आणि सोयाबीनचे भा’व पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतात,असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. देशातील कापूस बाजाराचे लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे.कारण सुतगिरण्या आणि कापड उद्योगाने अर्थमंत्र्यांकडे कापूस आयातीवरील 11% शुल्क काढण्याची मागणी केली.
रकार ही मागणी मान्य करण्याची शक्यताही नाही.उद्योगांनी करात सवलती तसेच सूत आणि कापड निर्यातीसाठी अनुदान देण्याचीही मागणी केली.देशातील काही बाजारांमध्ये आज कापूस दरात किंचित वाढ दिसली.पण ही वाढ सर्वत्र दिसली नाही. आजही सरासरी दरपातळी कायम होती.पण दुसरीकडे कापूस आवक घटली.एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक झाल्याचे दिसते.सरासरी दरपातळी 8 हजार ते 8 हजार 500 रुपयांच्या दरम्यान होती.
कापूस बाजार वाढण्याचे कारण काय?
सरकीच्या भावात वाढ झाली म्हणून कापूस दरात वाढ झालेली नाही तर कापसाच्या आवकेत मोठी घट झाली असल्याने कापूस दरात वाढ झाली आहे. खरं पाहता गेल्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 44 हजार गाठीहून अधिक आवक होत होती.पण सद्यस्थितीला 22 ते 23 हजार कापूस गाठींची आवक राज्यात होत आहे.
निम्म्याहून कमी आवक सद्यस्थितीला कापसाची बाजारात सुरू आहे.यामुळे देखील दबावात गेलेले दर अचानक सावरले आहेत.चीनकडून 100 लाख गाठींची आयात जगभरातून होणार आहे.साहजिकच यामुळे कापूस बाजारावरील दबाव कमी झाला आणि यामुळे कापूस दरात सुधारणा होत आहे.
Cotton farming session
सरकारने आयतीवर बंदी घालून आयात शुल्क वाढवायला पाहिजे,जेणेकरून शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल. सरकारच्या चुकीचे धोरणांमुळे आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.यावरचा तोडगा काढण्यासाठी सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यायला पाहिजे असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
आजचे ताजे कापूस बाजार भाव येथे पहा